पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज आठवडे बाजार होता. या बाजारात विना मास्क कोणी येऊ नये, तसेच विनाकारण कोणी फिरू नये, म्हणून आज नीरा येथील पोलिसांनी बाजारात खडा पहारा दिला.त्यामूळे आज बाजारात लोकांनी मास्क वापरणे पसंद केले.
नीरा शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.त्यामूळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत.नीरा बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी होत असते. त्यामूळे आज पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार यांच्या नेतृत्वात एक पथक बाजारात दिवसभर ठाण मांडून होते. यावेळी बाजारात त्यांनी दहा जणांवर विना मास्क बाबत कारवाई केली तर बाजार बाहेर दहा असे वीस लोकांवर कारवाई करून दहा हजार दंड वसूल केला आहे.
तर १७ वाहन चालकांवर ऑनलाईन केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास गोटपगर यांनी दिली. या कारवाई मध्ये सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड,सुदर्शन होळकर,पोलीस कॉन्स्टेबल निलेश कऱ्हे,निलेश जाधव होमगार्ड किरण शिंदे,प्रसाद तारू यांनी सहभाग घेतला निराचे पोलीस यांनी पोलिसांना मदत करून कारवाईत सहभाग घेतला.