बारामती ता.१६-: वडगांव निंबाळकर येथे स्पोर्ट क्लब ५ किलोमीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन…..
सुनिल निंबाळकर / बारामती प्रतिनिधी
रविवार दिनांक १४ मार्च रोजी सकाळी ठीक ८ वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या मॅरेथॉन साठी पुणे, नगर सातारा,वाई,करमाळा,शिरूर फलटण या विविध भागातून ७० ते ८० स्पर्धाकानी भाग घेतला होता..
या स्पर्धेचे उदघाटन वडगांव निंबाळकर गावचे विध्यमान तसेच कार्यक्षम सरपंच श्री.सुनिल दादा ढोले यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तसेच निशाणा दाखवुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली..
स्पर्धेचे सर्व नियोजन व मार्गदर्शन पी एम गायकवाड सर पैलवान नानासाहेब मदने अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा,जितेंद्र पवार अध्यक्ष जाणता राजा प्रतिष्ठाण वडगांव निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य पिंटू किर्वे,क्रीडा शिक्षक निलेश दरेकर सर यांनी केले..
स्पर्धेचा सुरुवात होळ रोड येथून करण्यात आली होती ती पुढे जाऊन कारंडेमळा येथून माघारी फिरून येऊन पुन्हा वडगांव मधील होळ चौका पर्यत शेवट करण्यात आला..
यावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी आपलं आख आयुष्य घालवून एक वेगळा ठसा उमठवणारे आपल्या सर्वांचे लाडके असे क्रीडा शिक्षक पि.एम.गायकवाड सर यांनी सर्व स्पर्धकांना विविध खेळाविषयी सर्वांना मार्गदर्शन केले.आशा स्पर्धकांमध्ये युवकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्र चे नेतृत्व न करता भारताचे नेतृत्व करावे असे त्यांनी शेवटी सांगितले..
आणि आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात करावे.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रथम येणाऱ्या १ ते ४ स्पर्धकांना ट्रॉफी,मेडल प्रमाणपत्र तसेच रोख स्वरुपात अनुक्रमे ५००१रु,३००१रु,२००१रु,१००१ रू.असे रोख स्वरुपात रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले..
तसेच ४ ते १५ येणाऱ्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले..
यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक-सुरज लष्मण खोटरे(वाई)
दुतीय क्रमांक-अनिल मारुती पन्हाळकर (वाई)तृतीय क्रमांक-गणेश विलास जाधव(सोमेश्वर) चतुर्थ क्रमांक- गणेश परशुराम कोळेकर
असे कर्मावर स्पर्धकांची निवड करण्यात आली
यावेळी लहान गटात चि.चैतन्य नानासाहेब मदने,चि. विनय भागवत,चि.अथर्व लोणकर,कु.आर्या नानासाहेब मदने,या लहान स्पर्धकांनी भाग घेतल्यामुळे त्याना स्पोर्ट क्लब कडून काही रोख स्वरूपात बक्षिसे देऊन त्याना गौवरण्यात आले.सर्व प्रेक्षकांनी या लहान मुलांचे विशेष कौतुक केले..
सदरचा कार्यक्रम कोविड चे संपुर्ण आदेशाचे पालन करून पार पाडण्यात आला.
स्पोर्ट क्लब तर्फे सर्वांना केळी व बिसलेरी पाण्याची सोय करण्यात आली होती.
यावेळी वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन चे विशेष सहकार्य लाभले..
ह्या स्पर्धा खेळी मेळीच्या वातावरनात पार पाडल्या..
वडगांव निंबाळकर मधील सर्व ग्रामस्थांकडून सर्वांचे कौतुक करण्यात आले..
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.जगनाथ लकडे-तालुका क्रिडा अधिकारी बारामती
पि.एम.गायकवाड सर-क्रिडा शिक्षक राहुल आगम -ग्रा. सदस्य,सचिन साठे-चेअरमन श्रीनाथ पत संस्था पैलवान नानासाहेब मदने-अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा,अमोल गायकवाड अध्यक्ष बहुजन हक्क परिषद बारामती तालुका,प्रमोद उर्फ पिंटू किर्वे,आण्णा भोसले,सुनिल खोमणे,जितेंद्र पवार,निलेश दरेकर सर,हरिभाऊ आगम,संतोष गायकवाड,पांडुरंग पवार,किशोर आगम,रांगोळे सर,संजय आगम इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य वडगांव निंबाळकर चे विध्यमान सदस्य श्री.राहुल आगम,युवा उदोजक विनोद आप्पा लोणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कारंडे,मुंबई पोलिस लखन भैय्या लोणकर,तसेच श्रीनाथ पतसंस्था वडगांव निंबाळकर चे चेअरमन श्री.सचिन जी साठे यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सहकार्य केले..
या स्पर्धेचे आयोजन गौरव आगम,मयुर आगम,ऋषिकेश आगम,धिरज हिरवे, आणि त्यांच्या सहकारी मित्र परिवाराने आयोजन केले होते…
चौकट-;ग्रामिण भागातील तरुण तरुणींनी असा स्पर्धेमध्ये भाग घेणे खुप गरजेचे आहे ज्यांनी करून असा स्पर्धा ग्रामीण भागात वारंवार होणे गरजेच्या आहेत त्यामुळे गोरगरीब होतकरू मुलाना अशा स्पर्धेतून तालुकास्तरिय,जिल्हास्तरीय,
राज्यस्तरिय तसेच आंतरराष्ट्रीय खेळा मध्ये वाव मिळू शकतो असे मत जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांनी यक्त केले…