महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब-इंदापूर)
भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांना मोठा धक्का
इंदापूर तालुक्यातील ३६ दुध उत्पादक संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम१९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार “अवसायनात”घेतल्याचे पुणे येथील सहकारी संस्था (दुग्ध) चे सहाय्यक निबंधक प्रवीण परब यांनी जाहीर निवेदनाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे,अश्या प्रकारचे जा.क्र. सनी (दुग्ध)पुणे/अवसायन/निवेदन/सन२०२०,सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,(दुग्ध)पुणे दिनांक १८ऑगस्ट२०२०रोजी प्रसिद्ध केले आहे.इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून त्याचा पुरवठा शासकीय दूध संघांना करण्याचे महत्वपूर्ण काम या संस्था करीत होत्या, शेतकऱ्याचा आर्थिक कणा म्हणून या संस्था कडे पाहिले जात होते.
तालुक्यातील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारण या संस्था वर चालत होते,कार्यकत्याना खुष ठेवण्यासाठी ह्या संस्था कडे पाहिले जात होते.परंतु आजच्या सहाय्यक निबंधक काच्या या निर्णयामुळे या संस्था चे चेअरमन, सचिव व सभासद संस्था बंद होणार या भीतीने चांगलेच हादरले आहेत,इंदापूर तालुक्यातील प्रामुख्यानेपांडुरंग सह दुध उत्पादक संस्था (वनगळी) श्री शहाजी सह दूध उत्पादक संस्था(पीठेवाडी),हनुमान दूध उत्पादक सह संस्था (बोरी),नितीन दूध उत्पादक संस्था,मारकडवस्ती(नाव्ही),श्रीकृष्ण दूध संस्था भोसले वस्ती (तरंगवाडी),आनंद सह दुध उत्पादक संस्था,पिराचीवाडी(निमसाखर),विठ्ठल सह दूध संस्था(नरूटवाडी),राधाकृष्ण सह संस्था (तरंगवाडी),श्री गणेश सह दूध संस्था (अकोले),श्री संत दूध सह संस्था (शेळगाव),संजीवनी दूध उत्पादक संस्था शिनगारे वस्ती (तरंगवाडी),श्री ज्ञानेश्वर सह दूध संस्था (तावशी),श्रीकृष्ण सह दूध उत्पादक संस्था(रेडा),श्री अंनत सह दूध उत्पादक संस्था(सनसर),शिवगंगा सह दूध उत्पादक संस्था(काटी)पांडुरंग सह दुध उत्पादक संस्था(कुरवली)श्री गणेश सह दूध उत्पादक संस्था (वरकुटे खुर्द)पांडुरंग सह दूध उत्पादक संस्था (निंबोडी),अलकादेवी दूध उत्पादक सह संस्था (निमसाखर),श्री शंकर दूध उत्पादक संस्था( काझड),श्रीराम सह दूध उत्पादक संस्था(बोरी),रामलक्ष्मण सह दूध संस्था (लाकडी),हनुमान सह दूध उत्पादक संस्था (शिरसाटवाडी) अनिल सह दूध उत्पादक संस्था (जाचकवस्ती),भैरवनाथ सह दूध उत्पादक संस्था(कचरेवाडी),जय भवानी सह दूध उत्पादक संस्था(खोरोची),हनुमान दूध उत्पादक सहकारी संस्था(गोखळी),कपिला सहकारी दूध उत्पादक संस्था(तरंगवाडी),शीतल सह दूध संस्था(रनगावं)संग्रामसिंह दूध उत्पादक संस्था(लाखेवाडी),भैरवनाथ सह दूध संस्था ३९ फाटा(सणसर),वरकुटे खु।। सह दूध उत्पादक संस्था(शेटफळं-हवेली),पदामावती दूध उत्पादक संस्था(पिंपळे),श्री शंकर दूध उत्पादक संस्था(निरगुडे),श्री दत्त उत्पादक संस्था(कळस) या एकूण ३६ दूध उत्पादक सहकारी संस्था अवसायनात घेतल्या आहेत,या संस्था नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम २१ अन्वये रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहेया परिपत्रकामुळे या संस्था रद्द झाल्यास त्याचा विपरीत परिणाम दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणार आहे.
यातील काही दूध संस्था चे “ब वर्ग”प्रतिनिधी करीता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे
तालुक्याचे आमदार व दुग्ध विकास राज्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे




















