खासदार उदयनराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नातून पुर्णत्वाकडे चाललेल्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक अशा MSEB च्या एक्सप्रेस फिडर लाईनच्या कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणी केंद्रा जवळील MSEB आॅफिस येथे संपन्न झाला.
शाहुपुरी ग्रामपंचायत असताना या भागातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा व्हावा म्हणून शाहुपुरी ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी काळभैरव पॅनलने या पॅनलचे प्रमुख श्री संजय पाटील आणि त्यांचे आत्ता निवडून आलेले सदस्य व मागच्या कार्यकालातील निवडून आलेल्या सदस्यांनी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली कण्हेर पाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात यावी म्हणून प्रयत्न केले, सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यावर या प्रयत्नांना नगरपरिषदेतील माननीय उदयनराजे यांच्या विचारांनी समाजकरण करणार्या माननीय नगराध्यक्षा सौ माधवी कदम, उपनगराध्यक्ष श्री मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सौ सिता हादगे, आरोग्य सभापती सौ अनिता घोरपडे, समाजकल्याण सभापती सौ संगिता आवळे, माजी शिक्षण सभापती श्री राम हादगे, नगरसेवक श्री बाळासाहेब ढेकणे व इतर सर्व सदस्यांची पण साथ मिळाली.
कण्हेर पाणी पुरवठा योजना बहुतांश पुर्ण झाली आहे पण कण्हेर येथे कायम लोडशेडिंग असते त्यामुळे तेथील उपसा केंद्रास कायम/सुरळीत विज पुरवठा होऊ शकत नाही आणि विज पुरवठा वारंवार खंडीत झाला तर शाहुपुरीवासीयांना २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही हा विचार करून माननीय खासदार उदयनराजे यांनी उपसा केंद्रासाठी MSEBची स्वतंत्र एक्सप्रेस फिडर लाईन टाका अशा सुचना दिल्या, त्याच कामाचा शुभारंभ बुधवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आकाशवाणी जवळील MSEB आॅफिस येथे संपन्न झाला.
सदर कण्हेर पाणी पुरवठा योजना मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती उपसभापती श्री संजय पाटील, सातारा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सौ सिता हादगे, माजी शिक्षण सभापती श्री राम हादगे, शाहुपुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री गणेश आरडे, माजी उपसरपंच श्री राजेंद्रशेठ गिरीगोसावी, श्री अमित कुलकर्णी, श्री रमेश धुमाळ,सुधाकर यादव, श्री शंकर किर्दत, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य सौ मुग्धा पुरोहित, सौ मयुरा कुलकर्णी, सौ लता राजापुरे, श्रीमती लीलाताई शितोळे, सौ धनश्री ग्रामोपाध्ये, सौ अमृता प्रभाळे यांच्या बरोबरच श्री आण्णा राजापुरे, श्री राहुल यादव, श्री अनिरुद्ध दाभाडे, श्री मंदार पुरोहित आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर पाणी योजना पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार्या श्री संजय पाटील आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचे तसेच नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व त्यांच्या सर्व सहकार्यांचे शाहुपुरीतील नागरिकांच्यात कौतुक होत आहे, आणि कायम शाहुपुरीवासीयांचा विचार करणार्या खासदार उदयनराजे यांच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा बघून शाहुपुरीतील नागरिक त्यांचे मनापासून आभार मानत आहेत