दहिवडी : ता.३०
माण तालुक्यातील गोंदवले या ठिकाणी श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम नवमी यात्रा दरवर्षी भरत असते यावर्षी आयोजकांच्या वतीने शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी दुपारी चार वाजल्याच्या पुढे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. या भव्य आणि दिव्य कुस्ती मैदानासाठी माण, खटाव, फलटण, माळशिरस, खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यातील पैलवानांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सदरचे कुस्ती मैदान नवचैतन्य हायस्कूल पटांगण गोंदवले बुद्रुक या ठिकाणी भरवण्यात येणार असून सायंकाळी ०७:३० वा. बाजार पटांगणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती श्रीराम नवमी यात्रा आयोजकांच्या वतीने देण्यात आली.




















