पंचायत समिती वाई चे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी मा.सुधीर महामुनी यांचे कल्पकतेतून घेण्यात आलेल्या वाई तालुक्यातील इयत्ता चौथीच्या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद केंजळ शाळेतील तब्बल तीन विद्यार्थ्यांनी तालुका गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यामध्ये साईराज उमेश कदम ६ व्या, युवराज अमोल कदम १२ व्या व संचिता राजेंद्र कदम १३ व्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. MPSC व इतर स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इ. ५ वी साठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इ. ८ वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन केले जाते. सदरच्या परीक्षांची पूर्वतयारी व्हावी म्हणून इ. १ ली ते ७ वी साठी विविध शै. संस्थांमार्फत प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन केले जात आहे. अशा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी इ. ४ थी साठी वाई तालुक्यात प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येतात.
त्यांचा सत्कार वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.नारायण घोलप साहेब, तसेच बांधकाम विभागाचे श्री.संजय जाधव साहेब, पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. मुलांच्या वर्ग शिक्षिका सौ.शिला मांढरे (पिसाळ ) यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा बाबर, सर्व शिक्षक सौ.मनिषा पारखे, दिपक कासवेद तसेच शाळा व्यवस्थापन समिती केंजळचे अध्यक्ष अमोल कदम, उपाध्यक्षा सौ.सुप्रिया जगताप, सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत केंजळचे सरपंच मिलन गायकवाड, उपसरपंच व सर्व सदस्य, सर्व पालक व सर्व ग्रामस्थ केंजळ यांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.