महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जून महिना अखेर निकालात निघाला आहे .इंदापूर तालुक्यातील गावांत कधी नव्हे इतका जोरदार पाऊस जून महिन्यात पडला आहे , जुनच्या पहिल्याच आठवड्यात इंदापूर तालुक्यात पावसाने दमदार एंट्री केली आहे .जानेवारी ते मे अखेरच्या महिन्यामध्ये तालुक्यातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता ,तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात उभी पीके जगविणे , पशुधन जगविणे , आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे हाच गंभीर प्रश्न तालुक्यातील प्रशासनासमोर उभा राहिला होता ,
तालुक्यातील गावांगावातून पाण्याचा मागणीचा जोर वाढला होता , तालुक्यातील राजकीय परिस्थिती खूप वेगळी आहे ,राज्याचे पशुसंवर्धन मंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा “राजकीय दबदबा” आहे.गावोगांवातील कार्यकर्ते व शेतकरी या दोन नेत्यांकडे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची मागणी करीत होते , त्यांची मागणीही रास्त होती , याबाबत कोणताही मीडिया आक्षेप घेऊ शकत नव्हता , त्यामुळे आरोप प्रत्यारोप यांच्या फेरी गावोगांवी झाडल्या जात होत्या , त्यामुळे प्रशासनावर जोरदार दबाव निर्माण झाला होता .तालुक्यात शेतीच्या पाण्याची व्यवस्था ही भाटघर , खडकवासला या धरणांतून कालव्याद्वारे केली आहे , या पाण्याचे नियोजन व्यवस्थित होण्याकरिता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे
या समितीत जिल्ह्यातील पालकमंत्री , सर्व विधानसभा व लोकसभा सदस्य , सर्व साखर कारखान्याचे अध्यक्ष , जिल्हाधिकारी , पाटबंधारे विभागाचे अधिकारी , इतर तज्ज्ञांचा समितीत समावेश आहे ,इंदापूर तालुक्यातील साधारणतः या धरणातून अडीचशे किलोमीटरवरून पाणी येते याचे नियोजन ही समिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी , पाटकरी, खलाशी , इतर कर्मचाऱ्यांच्या मार्फत केली जाते , काही वेळा राजकिय दबावाखाली किंवा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडते याचा अनुभव इंदापूर करांनी घेतला आहे , हे विसरून चालणार नाही .सध्या जून, जुलैत तालुक्यात पावसाने जोरदार सुरुवात केली असल्याने शेतीसाठीच्या पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे .
इंदापूर तालुक्यात शक्यतो “नवचंडीत” पाऊस पडतो हा सर्वसाधारणचा अनुभव आहे ,तालुक्यात सतत पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासा व संजीवनी देणारा आहे ,लाॅकडाऊन काळात शेतकरी निवांत होता , पावसामुळे जमिनीत दमदार आणि जोमदार पाऊस झाल्याने विविध पिके घेण्याच्या आणि जमिनीच्या मशागती करण्यात शेतकरी गुंतले आहेत , कारभारणीसंगे शेतात राबत आहेत , ही बाब कौतुकास्पद आहे .मका , बाजरी , ऊस लागवड , भाजीपाला पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा जास्त कल आहे ,मौसंबी , सीताफळ या फळबागा ची लागवड रेडणी गावातील परिसरात मोठया प्रमाणावर चालू असल्याचे दिसून येत आहे ,ऊस लागवडीच्या बाबतीत कळंब , वालचंदनगरसह तालुका राज्यात अग्रेसर आहे , कारणही तसेच आहे , तालुक्याची भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती खूपच परिणामकारक आहे , या तालुक्याच्या दोन्ही बाजूंनी दोन नद्या वाहत जातात, यामध्ये नीरा व भीमा या दोन नद्या दक्षिण उत्तर समांतर वाहत असून पूर्वेला तालुक्यातील निरा नरसिंहपुर येथे एकत्र येत “संगम” झाला आहे .
तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागात काळी जमीन आहे , तर उत्तर आणि पुर्व भागात फळबाग शेतीला उपयुक्त असणारी जमीन आहे ,साधारणपणे तालुक्यातील शेतकरी सर्वाधिक ऊसाचे पीक , तर डाळिंब , द्राक्षे व इतर फळ पिके मोठया प्रमाणावर घेतली जातात , उसाच्या बाबतीत विचार करिता तालुक्यात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना , निरा भीमा सहकारी साखर कारखाना , छत्रपती सहकारी साखर कारखाना हे तीन सहकारी कारखाने तर बारामती अॅग्रो हा खाजगी साखर उद्योग आहे , तर सोनाई सारखा गूळ प्रक्रिया उद्योग याच तालुक्यातील आहे .
दूध उत्पादन सारखा शेती पूरक व्यवसाय व उद्योग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे , यामध्ये सोनाई दूध प्रक्रिया , नेचर दूध , अमूल दूध प्रक्रिया ( दुधगंगा दूध उत्पादक संघ ) मोठया जोमात चालू आहेत , अख्या शेतकऱ्यांच्या जिवनातील अर्थ कारण या व्यवसायावर अवलंबून आहेत , सध्या या तालुक्यातील गोखळी गावातील मंगलसिद्धी मल्टिपर्पज दूध प्रक्रिया संघ बंद आहे, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे.
तालुक्यातील शेतीला पावसाचे व धरणाचे पाणी वेळेवर मिळाल्यास या तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत , ही वस्तुस्थिती आहे ,तालुक्यातीत ब्रिटिश कालीन शेटफळ हवेली गावांतील तलाव , भादलवाडी ,वरकुटे , वडापुरी , रेडणी जवळील वाघाळे तलाव भरून घेतले पाहिजेत . निरा भीमा नदीवर असणारे सर्व बंधारे भरून घेतले पाहिजेत , असे या तालुक्यातील शेतकऱ्यांचं मत आहे .
शेतकरी हित जोपासण्यासाठी तालुक्यातील सत्ताधारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व विरोधी पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मोठया ताकतीने प्रयत्न केले पाहिजेत .