पुरंदर तालुक्यातील.पुणे पंढरपूर मार्गावर पिंपरे खुर्द. हद्दीत मध्ये मोटारसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली यांच्या मध्ये जोरदार धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी खाजगी दवाखण्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्रत्यक्ष दर्शिनी दिलेली माहिती अशी की,आज दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजले चां दरम्यान वाल्हा बाजूकडून नीरा बाजूकडे निघालेल्या एका ट्रॅक्टर ट्रॉली ला पाठीमागून येणाऱ्या मोटार सायकल क्र. एम एच १२ एफ एस ४६८८ ने जोरदार धडक दिली.यामध्ये मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झालाय.त्याच्या नाकाला जोरदार मार लागला असून त्याला स्थानिक लोकांनी रुग्णवाहिका बोलाऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघात जखमी व्यक्तीजवळ दीपक भीमराव चव्हाण या नावाचे ओळखपत्र आढळून आले आहे.त्यावर पुरंदर तालुक्यातील काळदरी गावाचा निवासी पत्ता असल्याचे दिसून आले आहे.






















