महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी/ गणेश पवार :
साखरवाडी ग्रामपंचायत मार्फत सुरू करण्यात आलेल्या कोव्हिडं विलगीकरण कक्षात खराडेवाडी येथील सार्थक मनोहर गायकवाड हा कोरोणा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने साखरवाडी ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षात मागील दिवसात दाखल झाला होता यावेळी वय लहान असल्याने त्याची मनस्थिती भितीदायक होती त्यातच तो रडायचा परंतु विलगीकरण कक्षाचे तेथील आनंददायी परिस्थिती,मनमोकळे वातावरण असलेल्या कक्षात तिथे त्याच्या कुटुंबियांनी प्रथमतः त्याला धीर दिला तसेच तेथे दिलासा देणारा स्टाफ अनिल चांदगुडे व ग्रामपंचायत कर्मचारी घोलप यांनी त्याला बोलके केले आज तो सर्वांच्या मध्ये मिसळून गेला आहे त्यानंतर त्याने आपण उत्कृष्ट पोवाडा गायन करतो असे सांगितले या नंतर त्याला माईक ची सोय करून दिल्यानंतर तो दररोज तेथे असलेल्या सर्व कोरोना रुग्णांच्या समोर पोवाडा सादर करून करमणूक करून मनोबल वाढवत आहे कोरोना सारख्या आजाराला न घाबरता त्याला धैर्याने सामोरे जाऊन आपण आनंदी राहिले पाहिजे असा संदेश खराडेवाडी चा सार्थक गायकवाड देत आहे. एवढ्या लहान वयात पोवाडा गायन करत असल्याने साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले व ग्रामपंचायत सदस्य विक्रम ढेंबरे यांनी त्याचे कौतुक केले यावेळी संग्राम औचरे ,दादा जाधव,अनिल चांदगुडे, ग्रामपंचायत कर्मचारी डुबे, घोलप ,बोडरे उपस्थित होते