महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :इंदापूर
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील ग्रामसुरक्षा दलाचे काम चांगले असून ग्रामसुरक्षा कामासोबत सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे मत वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी व्यक्त केले .
निमसाखर येथील ग्रामसुरक्षा दला चे युवक चांगले काम करीत आहेत , राञीच्या वेळी गावातील कुठल्याही प्रकारची चोरी होऊ नये , याकरीता राञीच्या वेळी गस्त घालण्याचे चांगले काम करीत आहेत .कोरोनाच्या कामात हि सर्व नियमांचे पालन करून , मदत करण्याचे आवाहन केले .शेखर पानसरे हे नेहमीच सामाजिक कामात मदत करीत असतात ,असे दिलीप पवार यांनी सांगितले
यावेळी निमसाखर येथील ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना सामाजिक युवा कार्यकर्ते शेखर पानसरे यांच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते 34 टि शर्ट किटचे वाटप करण्यात आले .