सातारा : गुरूकुल स्कूलच्या कु . वैष्णवी पवार हिने उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत ४ सुवर्णपदके मिळविली आहेत.
गुरूकुल स्कूलची इ . ७ वी मध्ये शिकणारी कु . वैष्णवी संतोष पवार हिने उज्जैन येथे झालेल्या राष्ट्रीय मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा २०२०-२१ मध्ये मुलींच्या वयोगट १२ मध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. या तिच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी तिचा सत्कार केला.
यावेळी सचिव आनंद गुरव, मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, उपमुख्याध्यापिका अनुराधा कदम , जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे , माध्यमिक विभागप्रमुख सोनाली तांबोळी उपस्थित होते.
राष्ट्रीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा दि . २६ ते ३० सप्टेंबर रोजी माधव सेवा न्यास उज्जैन मध्यप्रदेश येथे पार पडल्या. २ वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले . वैष्णवी पवार हिने निर्विवाद वर्चस्व राखत सांघिक, पुरलेला मल्लखांब, दोरीवरील मल्लखांब आणि वैयक्तिक विजेते स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करत एकुण ४ सुवर्णपदके तिने मिळविली आहेत.
तिच्या पुढील वाटचालीस मधुकर जाधव , अॅड . राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.