तातडीने नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(बिदाल) : आकाश दडस
माण तालुक्यात अनेक गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. मूग,भुईमूग, मका,बाजरी,ऊस तसेच जनावरांच्या चारा,फुलशेती,भाजीपाला शेती पिकाचे नुकसान झाले असून काही पिके पूणर्पणे भुईसपाट झाली तर काही पिके वाहून गेली आहेत.घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर अनेक ठिकठिकाणचे पुल,रस्ते वाहून गेले आहेत.मोठ्या डौलात उभी असलेली हातातोंडाशी आलेली पिके काही क्षणात भुईसपाट झाल्याने होत्याचे नव्हते करुन शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.
नुकसानग्रस्त पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून लवकरात-लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने याअगोदर पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने शेतातील काही पिके शेतातच सडली आहेत.दुबारपेरणीसह अनेक संकटाशी सामना करत मशागतीला केलेला खर्च सुध्दा पाण्यात गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने होणाऱ्या नुकसानाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.आहे.पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
पावसामुळे शेताला तळ्याचे मागील ५० ते ६० वर्षात येवढा कधीही पाऊस झाला नाही.आणि दुष्काळी भागात असा पाऊस होईल असे देखील कदाचित कोणालाच वाटले नसेल.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.तरी पंचमाने करून लवकरात-लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी.
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्वतः फोन उचलला मात्र
शेवरी गावातील युवा शेतकरी अमोल हिरवे यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सांगण्यासाठी कृषी सहाय्यक आणि कृषीमंडल अधिकारी यांना फोन केले मात्र त्यांनी लवकर फोन उचलले नाहीत त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या फोन न उचलण्याच्या प्रकाराला कंटाळून थेट कृषिमंत्री दादाची भुसे यांना संपर्क साधला कृषिमंत्री म्हणाले की मी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश संबंधित खात्याला देऊन शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही असे सांगितले





















