महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
भारत सरकारने यंदाचा अर्जुन पुरस्कार सुयश जाधव यांना जाहीर केला . त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी. सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुयश जाधव यांचा सत्कार करून अभिनंदन केले .
करमाळ्यातील सुयश जाधव यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अपघातात दोन्ही हात गमावले असतानाही अर्जुन पुरस्कार मिळविला आहे .
राज्य सरकारचा शिवछत्रपती, एकलव्य पुरस्कार असे एका पाठोपाठ एक पुरस्कार व पदके सुयश जाधव यांनी मिळविली आहेत . दोन्ही हात गमावलेनंतर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण व आजपर्यंत १११ पदके मिळविली आहेत. सन २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवीत सन्मान मिळवून दिला आहे.
सुयशच्या ह्या कामगिरी बद्दल भारत सरकारने यंदाचा अर्जुन पुरस्कार त्यांस जाहीर केला आहे . दि .२९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे . त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी सुयश जाधव यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .