महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दहिवडी :
गेले सतरा वर्षी धनगर समाजाला एस टीचे आरक्षण मिळावे म्हणून प्रत्त्येक निवडणूकीत धनगर समाजाचे नेते समाज त्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचे काम करुन स्वता मात्र पदे मिळवत होता व समाज आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचे काम करत होता आत्ता धनगर समाजाने ओळखले आहे
प्रत्येक पक्ष धनगर समाज्याचा मता साठी वापर करुन सत्ता मिळवता होता आतल्या यापुढे चालणार नाही आधी आरक्षण जाहिर करा या मागणीसाठी
श्री नागोबा मंदिरात नागोबा देवालयावर भंडारा उधळून धनगर समाज्याच्या वतीने ढोल वाजवून झोपलेल्या ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्यात आले धनगर समाज्याला एसटी आरक्षण व 1000 कोटीची आथिँक तरतूद व मेढपाळ वरील वाढते हल्ले , यासाठी धनगर बांधवांकडून माणतालुक्यात म्हसवड येथील नागोबा देवालयात भंडारा उधळून ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन करण्यात आले.
खासदार विकास माहात्मे व आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी महाराष्ट्रभर ढोल बजाव आंदोलन करण्याचे व शासनाला जाग आणण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला माणतालुक्यातील धनगर समाजबांधवांनी प्रतिसाद देत येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री नागोबा मंदीरात ढोल बाजाव आंदोलन करुन आपल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. यावेळी या आंदोलनात पै. श्रावण पडळकर, बाबासाहेब माने, विठ्ठल विरकर, विशाल माने, सत्यवान सुळे यांचेसह अनेक समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी झाले होते.