महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार :
वडजल ता फलटण या ठिकाणी वाठार फाटा ते वडजल या रोडवरती दत्तात्रय विठ्ठल घाडगे यांच्या मालकीच्या गट नंबर १३९ या शेतातील गोडाऊन जवळ मोकळ्या जागेत दोन ते तीन दिवसापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक कोणीतरी सोडून गेले असून आज सकाळी पहाटे५.३० वाजता वडजल वरून वाठार फाटा या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतातील गोडावून शेजारी आढळून आले असून मातृत्वाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून हे अर्भक येथे कोणी सोडले याचा पोलीस तपास घेत आहेत.





































