दि. ०२/०४/२०२१ रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे अध्यक्षतेखाली covid-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. दिनांक २९/०६/२०२० रोजीच्या आदेशामध्ये त्या-त्या जिल्ह्यातील परिस्थितीप्रमाणे संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढण्याबाबत सर्वाधिकार देण्यात आलेल्या आहेत.
याच अनुषंगाने डॉ.राजेश देशमुख ( जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे ) पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत लॉकडाउनच्या मुदतीत covid-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
१. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत दिनांक ०३/०४/२०२१ पासून सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस १०००/- रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
२. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीत दि. ०३/०४/२०२१ पासून सायंकाळी ६.०० ते सकाळी ६.०० या वेळेत संचारबंदी ठेवण्यात आलेले आहे. मात्र यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा ( दूध,भाजीपाला,फळे इतर) व अत्यावश्यक सेवा पुरवणारे, वृत्तपत्र सेवा, कोविड लसीकरणासाठी जाणारे नागरिक या सर्वांना वगळण्यात येत आहे.
३. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीतील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमा हॉल, नाट्यगृह, स्विमिंग पूल, व्यायामशाळा पुढील सात दिवसांसाठी संपूर्ण बंद राहतील.
४.पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील पीएमपीएमएल दिनांक ०३/०४/२०२१ पासून सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहील.
५. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीतील आठवडे बाजार देखील ०३/०४/२०२१ पासून ७ दिवसांसाठी बंद राहील.
६. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व छावणी परिषद हद्दीतील सर्व धार्मिक स्थळे ०३/०४/२०२१ पासून ७ दिवस बंद राहील.
७. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा शैक्षणिक संस्था महाविद्यालय ३०/४/२०२१ पर्यंत बंद राहतील.
सदर आदेश ०३/०४/२०२१ पासून ०९/०४/२०२१ पर्यंत लागू करण्यात येत आहे.