बारामती : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा राष्ट्रवादीच्या श्री सोमेश्वर विकास पॅनेलमधील उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह एकवीस उमेदवारांना संधी मिळाली आहे.
उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे :-
निंबूत खंडाळा या गट क्रमांक १ मधून जितेंद्र नारायण निगडे, लक्ष्मण गंगाराम गोफणे, अभिजीत सतीशराव काकडे यांना संधी मिळाली आहे. मुरूम वाल्हा या गट क्रमांक २ मधून विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम रामराजे जगताप, माजी अध्यक्ष राजवर्धन शिवाजीराव शिंदे व ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड यांना संधी मिळाली आहे.
होळ – मोरगाव गट क्रमांक ३ मधून आनंदकुमार शांताराम होळकर, शिवाजीराजे द्वारकोजीराव राजे निंबाळकर व किसन दिनकर तांबे यांना संधी मिळाली आहे. कोऱ्हाळे – सुपा गट क्रमांक ४ मधून सुनील नारायण भगत, रणजीत नंदकुमार मोरे व हरिभाऊ महादेव भोंडवे यांना संधी मिळाली आहे.
पुरंदर तालुक्यातील मांडकी – जवळार्जुन गटा क्रमांक ५ मधून विश्वास मारुती जगताप, बाळासाहेब ज्ञानदेव कामथे व शांताराम शिवाजी कापरे यांना संधी मिळाली आहे.
अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी गटातून प्रविण युवराज कांबळे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मधून शैलेंद्र पंढरीनाथ रासकर, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून आनंद विनायक तांबे यांना; तर महिला राखीव गटातून कमल शशिकांत पवार व प्रणिता मनोज खोमणे यांना संधी मिळाली आहे. ब वर्ग गटातून संग्राम तानाजी सोरटे हे निवडणूक लढवणार आहेत.