सातारा दि. 28 : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ दूध संकलन केंद्रे सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दूध वितरणास परवानगी असेल”