महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
वाकुर्डे योजनेअंतर्गत दक्षिण मांड नदी काठावरील येनपे,माटेकरवाडी, चोरमारवाडी,शेवाळवाडी, घोगाव,उंडाळे, साळशिरंबे, महारुगडेवाडी,मनव, ओंड, नांदगाव, काले, जुजारवाडी, वाठार इत्यादी गावांना नेहमीच उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवते….
या गावातील ग्रामपंचायतीमार्फत गावाला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बहुतांश सर्व गाव विहिरी या दक्षिण मांड नदीकाठी असल्याने दक्षिण मांड नदीमध्ये उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये पाणी नसल्यास या विभागातील बहुतांश सर्वच गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो……
त्याचबरोबर शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांच्या विहिरी या नदी काठी असल्याने या नदीपात्रातील पाण्यांवरच या परिसरातील शेती अवलंबून आहे त्यामुळेच वाकुर्डे योजने च्या माध्यमातून दक्षिण मांड नदीमध्ये कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे….
या दृष्टीने कायमस्वरूपी पर्याय निघेपर्यंत आज रोजी या योजनेचे वीजबिलापोटी शेतकऱ्यांकडून जमा करावी लागणारी रक्कम भरल्याशिवाय पाण्याची उपलब्धता होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
इतर सर्व नेते फक्त अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत असून पैसे भरण्याबाबतची कोणतीही भूमिका घेत नाहीत ही सत्य परिस्थिती या विभागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवत आहेत यातून नागरिकांची दिशाभूल होत आहे…
याउलट डॉ.अतुल बाबा भोसले यांनी लोकांची गरज ओळखून ज्या ज्या वेळेस हे वीज बिल थकीत असेल त्या त्या वेळेस कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून हे वीज बिल संबंधित विभागास भरले असून त्यानंतरच दक्षिण मांड नदीपात्रात पाणी आले आहे….
गेल्या महिन्यातील 24 एप्रिल 2023 रोजी या विभागातील सर्व गावांनी मिळून साळशिरंबे येथे वाकुर्डे पाणी योजने संदर्भात बैठक आयोजित केली होती…
आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉ.अतुल (बाबा) भोसले यांना यावर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये या विभागांमध्ये जाणवत असणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात माहिती दिली होती व आग्रह धरला होता की या विभागासाठी वाकुर्डे योजनेचे चालू वर्षाचे थकित बिल आपल्या माध्यमातून भरून या विभागातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.
या बैठकीदरम्यान बाबांनी तात्काळ निर्णय घेऊन कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून हे थकीत बिल भरले होते.
त्यामुळेच आज दक्षिण मांड नदीमध्ये पाणी दिसू लागले आहे.
या नदी पात्रातील पाण्याचे “पाणी पूजन* आज दिनांक 15 मे 2023 रोजी” नांदगाव येथे नांदगाव ग्रामस्थ व दक्षिण मांड नदी ज्या गावांच्या कार्यक्षेत्रातून जाते त्या येनपे गावापासून ते शेवटच्या वाठार गावापर्यंत सर्वच गावातील प्रमुख नेते मंडळींच्या, लाभार्थी शेतकऱ्यांच्या,उपस्थितीमध्ये आज संपन्न झाले.
या दक्षिण मांड नदीपत्रातील उन्हाळ्यात आलेल्या वाकुर्डे योजनेच्याच्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांनी डॉ.अतुल (बाबा) भोसले यांचे मनस्वी आभार मानले व यापुढेही या विभागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घ्यावा अशी विनंती केली….. त्यास डॉ.अतुल (बाबा) भोसले यांनी ही उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना सकारात्मक प्रतिसाद दिला.