महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :कराड
सुपने गावातील उज्ज्वला विशाल सुर्यवंशी या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत,त्यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना वार्डात आपली सेवा बजावली,कोरोनो सारख्या महाभयंकर आजारापुढे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे,परंतु असंख्य नारीशक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
म्हणूनच कोरोनो योध्दा उज्ज्वला विशाल सुर्यवंशी यांचे त्यांच्या कार्याचा आदर ठेवून हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले यावेळी विशाल सूर्यवंशी,केदारनाथ अजित जाधव, , सरपंच सतिश पानुगडे,हिंदू एकतेचे तालुकाध्यक्ष गणेश पाटील, राहुल पडवळ,विकी कांबळे,महेश जाधव उपस्थित होते























