मुंबई -महाराष्ट्र राज्य काष्ट्राइब महासंघाचा लढा हा सर्व महाराष्ट्रला परिचीत आहे,काष्ट्राईब एम्प्लॉईमेंटच्या माध्यमातून या संघटनेने सुशिक्षित तरुणांना शासकीय नोकरीं दिलेली आहे. सर्व सामान्य जनता व समाजाच्या उत्थाणासाठी काष्ट्राइब कार्यरत आहे. सामाजिक न्याय प्राप्त करण्यासाठी कास्ट्राईब संघटनेने पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करावे
काष्ट्राइबच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतलेली आहे. मागासवर्गाचे कल्याण साठी संघर्ष करणारी का ष्ट्राइब संघटना आहे असा विश्वास मा दिनेश वाघमारे यांनी काष्ट्राइब महासंघाचे शिष्टमंडळ मा अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब यांच्या नेतृत्वात मा मा दिनेश वाघमारे, प्रधान सचिव वैद्दकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र यांना भेटले असता त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मा अरुण गाडे यांनी, काष्ट्राइब शासनाला सहकार्य करणारी संघटना आहे, परंतु कर्मचाऱ्याच्या न्याय हक्का साठी लढणारी संघटना आहे
14डिसेंबर रोजी शासकीय/निमशासकीय कर्मचारी संघटना संयुक्त समिती द्वारा आयोजित संपा मध्ये सहभाग घेऊन मागासवर्गीय यांचे प्रश्नाचे समावेश केल्यानंतर 5लाख मागास वर्गीय कर्मचारी संपात सहभागी झाले.
18तारखेला कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे,पदोन्नती तील आरक्षण,नवीन शिक्षण धोरण बंद करावे, मागासवर्गीय विध्यर्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न ,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन, अंगणवाडी कर्मचारीव आशा वर्कर्स यांना किमान वेतन कंत्राटी चालक यांच्या समयोजनसह च्या मागण्यासाठी विधानभवनवर मोर्चा आयोजित केला होता. असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेत आहे.दि 2जानेवारीला अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे काष्ट्राईब व अंगणवाडी कर्मचारी संगठना संघर्ष समिती द्वारा 20हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दि 3ऑक्टोबर 2022ला नागपूर येथे कर्मचारी व सामाजिक प्रश्नासाठी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक नागपूर असा एक लाख आदिवासी, ओबीसी, बंजारा, विमुक्त, भटके, आंबेडकरी समाजाचा मोर्चा अभूतपूर्व मोर्चा आयोजित केला होता. असे अनेक आंदोलन काष्ट्राइब द्वारा करण्यात येत आहे, शासनाने सहकार्य करावे हिच अपेक्षा.
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराशी बांधिलकी जोपसणारी ही संघटना आहे.
शासनाने कर्मचारी हितास प्राधान्य द्यावे, संघटना शासनाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे.असे अरुण गाडे यांनी म्हटले.
यावेळी दिनेश वाघमारे यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच काष्ट्राईब दिनदर्शिकेचे त्यांनी लोकार्पण केले.
याप्रसंगी यशवंत माटे, नागपूर विभाग अध्यक्ष, संजय धनगर, जिल्हा अध्यक्ष, ठाणे, संजय केदारे, काष्ट्राइब सुशिक्षित बेरोजगार संघटना, रवी गायकवाड, मुंबई विभाग काष्ट्राइब व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संकलन – संजय धनगर जिल्हा अध्यक्ष, ठाणे