पाचगणी सादिक सय्यद ; गत काही दिवसापासुन महाराष्ट्र नंदनवन पर्यटनाकरीता कोव्हीड १९ या महामरीमध्ये बंद ठेवण्यात आल होते . पर्यटनवर गुजरान असणाऱ्या पाचगणी व महाबळेश्वर मधील घोडे व्यवसायिक , छोटे स्टॅालधारक , याच्यासह हॅाटेल व्यवसायिक हवाला दिल झाले होते . महाबळेश्वर तालुक्यांतील विविध संघटना , पक्षानी पर्यटन पॅाईट सुरु करण्याकरीता जिल्हाअधिकारी सातारा शेखरसिंह याच्याकडे मागणी केली होती . महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनी पर्यटन सुरु करण्याकरीता कायम पाठपुरावा ठेवल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी येथील सर्व पर्यटन पॅाईट पर्यटकानकरीता खुले होणार असल्याची महत्वपुर्ण घोषणा आ मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे हिरडा नाका येथे आयोजीत महत्वपुर्ण बैठकीत केली .
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील , जिल्हाअधिकारी शेखर मुख्याअधिकारी पल्लवी पाटील , सार्वजनिक बाधकाम विभागाची अभियंता, तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते . महाबळेश्वर वाई खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील म्हणाले यांनी महाबळेश्वर तालुक्यांतील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा जीवनचरित्र हा पर्यटनावर अवंलबुन आहे. कोव्हीड १९ या महामरमध्ये महाराष्ट्राच नंदनवन कोलमडून पडले आहे .पर्यटकाना कोव्हीड १९ संसर्गजन्य साथीच्या रोगामध्ये खबरदारी घेत पर्यटकांनी पर्यटन पॉईट सुरु करावे अशी महत्वुर्ण घोषणा यावेळी आमदार मंकरंद पाटील यांनी केली
दरम्यान महाबळेश्वर व पाचगणी येथील पर्यटक पुरक व्यवसाय कर्जाच्या बोज्याखाली अडकले आहेत . याबाबत देखील महाविकास आघाडी सरकारने सकात्मक पाऊल उचलावीत अशी मागणी हॉकर्स , घोडा व्यवसायिक , टॅक्सिव्वसायिक यांची आहे. जगावर कोसळलेले संकट पर्यटन स्थळातील सर्वसामान्य जनतेला पिचवुन गेले आहे. महाराष्ट्राच नंदनवन पुन्हा पर्यटकानकरीता सुरु होणार असल्याची महत्वाची घोषणा पर्यटनवाढीने महाबळेश्वरला सुखकारक ठरेल.