महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी :म्हसवड
शहराच्या मुख्य मध्यवर्ती भागात राहणारा ५८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून म्हसवड शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे शनिवारी रात्री स्पष्ट झाले. शहराचे मुख्य समजल्या जाणाऱ्या भागात कोरोना बाधित सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रशासनाच्यावतीने कंटेनमेंट झोन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता तात्काळ १४ दिवसासाठी शहरातील मुख्य भागाचा परिसर लाॅकडाऊन करून सील करण्यात आला आहे.
येथील व्यापारी ५८ वर्षीय पुरुष गत काही दिवसापूर्वी बारामती तालुक्यातील एका गावात धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी नऊ जणांनी एकत्रित प्रवास केल्याचे समजते.तेथून आल्यावर ५८ वर्षीय पुरुषास त्रास जाणवू लागला त्यानंतर त्याने काही दिवस घरीच उपचार घेतले व नंतर त्रास वाढू लागल्यावर एका खाजगी रुग्नालयात दाखवले डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेण्यासाठी कराडला नेण्यात आले त्यानंतर त्याचा स्वाँब घेतल्यानंतर शनिवारी रात्री तो कोरोना पाँझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला असल्याने शहरात खळबळ माजली आहे.तर पॉझिटिव्ह रुग्नाच्या संपर्कात आलेले घरातील सदस्य, वाहनाचा चालक, घरकाम करणारी महिला व बाहेरगावी एकत्रीत प्रवास केलेले नऊ जण या सर्व जणांचे तपासणी करुन हि साखळी कुठ पर्यंत जातीय हे तपासणीनंतर रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल रात्री रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने म्हसवड शहरातील मध्यवतीँ भागातील पहिला पाँझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गाव हादरुन गेले आहे.दरम्यान रविवारी सकाळी तहसीलदार बी एस माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तलाठी यू एन आकडमल, पालिकेचे कर्मचाऱ्यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली व सतर्कतेच्या सूचना दिल्या असून करोनाची साखळी तोडण्यासाठी कंटेनमेंट झोन जाहीर करुन शहरातील मुख्य भाग सील करण्यात आला आहे. तसेच शहरात येणारे मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत