महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :लोणीभापकर
बारामती तालुक्यातील वाकी व चोपडज ओढ्यावरील बंधारा जोरदार पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. चोपडज पुलाला मध्ये तीन फुटापर्यंत खोल खड्डे पडले असून त्यात चारचाकी व दुचाकी वहाने पडून अपघात होत आहेत. तसेच रस्त्याची अवस्था ही खूप वाईट झाली आहे.
अनेक ठिकाणी रस्ता व साईडपट्टया खचल्या आहेत.यातून एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते त्याआधी या वाकी चोपडज रस्त्याचे काम व्हावे व पुलांची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.लोकांना प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, या रस्त्यावर आवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे, या कडे बांधकाम विभाग यांचे लक्ष नाही असे दिसते रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत,हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी चोपडजचे माजी उपसरपंच,माजी अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा बारामती तालुका उमेश गायकवाड व वकील इम्तियाज चांद खान आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.