कोल्हापूर,सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हातील विद्यार्थ्यान मिळणार प्रवेश
सातारा प्रतिनीधी-
राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले.कोल्हापूर,सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या पाच जिल्हांमध्ये ११वी ची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. सादर ऑनलाई प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.
ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्याचा प्रवेश अर्ज व संबंधित कगदपत्रे घेऊन प्रवेश निश्चित करावा. ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश शक्य नाही तेथे शासनने कोविड-१९ बाबत घालुन दिलेले नियमांचे पालन करूण प्रवेश द्यावी. इ ११वी प्रवेशाबाबत पालक व विद्यार्थी यांना त्रास होणार नाही. कोणतीही तक्रर कार्यालयास प्राप्त होणार नाही. इ ११ वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना प्रवेश मिळेल . इ ११वी वर्गात प्रवेशाविना विद्यार्थी वंचित राहणार नाही. असे सुचना माध्यमिक शिक्षणआधिकारी यांनी दिल्या आहेत.
उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून १८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीमध्ये आर्ज भरायचा आहे, २७ ऑगस्ट दिपारी ३.०० वाजता निवड यादी जाहीर होणार आहे. २८ ऑगस्ट ते १ सप्टोंबर यादिवसांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थाना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा १८ ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येणार आहे.
कसे असेल अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ?
• १८ ते २३ ऑगस्ट पासून अकरावी प्रवेश फॉम भरणे व स्विकारणे.
• २७ ऑगस्ट दुपारी ३.०० वाजेपर्यत निवड यादी जाहीर करणे.
• २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार.
• २ ते ३ सप्टेंबर प्रवेश शिल्लक आसल्सास प्रतिक्षा यादितील विद्यार्थ्याना प्रवेश दिला
• जाणार.