सातारा : महा आवास अभियान-ग्रामिण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था / व्यक्तींना महा आवास अभियान– ग्रामीण पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानुसार विभागस्तरावरती विरतीत कारण्याबाबतीत विभागस्तरीय अंमलबजावणी,सनियंत्रण व मूल्यामापन समितीची सभा दि २३.८.२०२१ रोजी सपन्न झाली.पुरस्कारासाठी नामांकने निश्चित केलेली आहेत. त्यानुसार विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण मा.विभागीय आयुतक्त,पुणे यांचे शुभहस्ते दि ३०-०८-२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजाता मुख्य सभागृह,विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे होणार आहे.जिल्ह्यातून पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा,तालुका ग्रामपंचायत व शासकीय जागा उपलबब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे संस्था / व्यक्तींना पुरस्कार दिला जाणार आहे.
पुणे विभागातून विभागस्तरावर निवड झालेली नावे खालील प्रमाणे
१) सर्वोत्कृष्ट जिल्हे
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण क्रमांक१.कोल्हापूर, क्रमांक२.पुणे क्रमांक३.सातारा. राज्य पुरस्कृत आवास योजना क्रमांक१.पुणे, क्रमांक२.सातारा, क्रमांक३.सांगली या कार्यक्रमास निमंत्रित मान्यवर १)मा.अध्यक्ष,जिल्हा परिषद. २)मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. ३)प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं.
२) सर्वोत्कष्ट तालुके
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण क्रमांक१.गगनबावडा(कोल्हापूर), क्रमांक२.पाटण(सातारा) क्रमांक३.राधानगरी(कोल्हापूर). राज्य पुरस्कृत आवास योजना क्रमांक१.कागल(कोल्हापूर) क्रमांक२.खेड(पुणे) क्रमांक ३.पाटण(सातारा). याकार्यक्रमास निमंत्रित मान्यवर १)मा.सभापती,पंचायत समिती. २)गट विकास अधिकारी,पं.स.
३) सर्वोत्कष्ट ग्रामपंचायत
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना एकत्रित क्रमांक१.भोर(पुणे) क्रमांक क्रमांक २.पाटण(सातारा) क्रमांक३.शिरुर(पुणे). या कार्यक्रमास निमंत्रित मान्यवर १) तहसिलदार,२) गट विकास अधिकारी.
वरील प्रमाणे विभागस्तरीय समितीने विभाग स्तरावरील पुरस्करासाठी नामांकने निश्चित केले आहेत. सादर पुरस्कार दिवशी उपस्थित राहणेबाबत आपले स्तरावरून कळविण्यात यावे ,त्याचप्रमाणे कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार विचारात घेता केवळ निमंत्रित मान्यवरांनीच उपस्थित राहणे तसेच कोविड-१९ च्या सूचनांचे पालन होईल. पुरस्कारांसाठी निमंत्रित केलेल्या मान्यावर सदर कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ११.३० वाजेपर्यंत वेळेत उपस्थित राहतील. अशा सुचाना उप आयुक्त (विकास) पुणे विभाग,पुणे डॉ.सीमा जगताप यांनी दिल्या आहेत.