नागठाणे /प्रतिनिधी
बोरगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावत दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ३० हजार रुपयांची अॅल्युमिनिअमची विद्युत तार व चोरीकामी वापरलेली ६० हजारांची मोटारसायकलसह एकूण ९ ० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला . सासपडे ( ता . सातारा ) येथील वाण्याची आळी ते मोटे डीपीदरम्यान बंद असणाऱ्या गाळ्यातील सुमारे दोन हजार फूट तब्बल ३० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनिअमची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी ३१ मेच्या रात्री चोरून नेली होती . याची तक्रार प्रधान तंत्रज्ञ अशोक चंद्रकांत फाळके यांनी बोरगाव पोलिस
या घटनेची माहिती घेऊन बोरगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळवीत त्वरित सूत्रे हलवीत पोलिस स्टेशनच्या डीबी पथकास सूचना केल्या त्यानुसार दादा स्वामी,बाळासाहेब जानकर , अमोल सपकाळ , विजय म्हात्रे यांनी तपास करत हर्षद राजेंद्र डांगे व तुषार सुरेश जाधव ( दोघेही रा . सासपडे , ता . सातारा ) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी आपण तार चोरल्याची कबुली दिली . त्यांच्याकडून सदरची चोरलेली तार व या गुन्ह्याकामी वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली .