दि.२६/८/२०२४ रोजी सदर खून प्रकरणी आरोपी युवराज बजरंग कामटे यांचे वकील ॲड विकास बा. पाटील यांनी आरोपी युवराज कामटे यास बचाव पक्षा तर्फे साक्षीदार म्हणून तपासले. दि ६/११/२०१७ व दि ७/११/२०१७ रोजी मिरज येथील सद् भावना हॅाल येथे सुत्र संचलनाचे कामी हजर होते यांचे फोटो व त्यानंतर ते त्यारात्री घरी झोपले होते हा पुरावा सादर केला.
सदरकामी अमोल भंडारे व मयत अनिकेत कोथळे यांना अटक केलेली नव्हती व तो तपास त्यांचेकडे नव्हता तसेच त्यांना दि.६/११/२०१७ रोजी न्यायालयात हजर केले नाही, माहिती अघिकारान्वये मिळालेली माहीती, याबाबतचा पुरावा सादर करण्यात आला.
दि ७/११/२०१७ रोजी सदभावना हॅाल चे काम संपले नंतर युवराज कामटे सायंकाळी घरी असताना आरोपी अमोल भंडारे व अनिकेत कोथळे सांगली शहर पोलीस स्टेशन मधून पळून गेलेची माहीती मिळाली व त्याला शोधने कामी आदेश दिला. पळून गेलेला ोोअमोल भंडारे मिळाला असून कोथळे मिळाला नसून युवराज कामटे यास दि.८/११/२०२७ रोजी पहाटे पोलीस मुख्यालयात बोलावले व कोणतिही कल्पना न देता अनिकेत कोखळे खून प्रकरणी अटक केली, तसेच अटक करते वेळी कोणीही नातेवाईक पोलीसांनी बोलाविले नव्हते हा मुद्दा समोर आणला.
दि.६/११/२०२७ व दि ७/११/२०१७ रोजी युवराज कामटे यांस सकाळी ९.०० मिरज सद भावना येथे असताना त्याचे सोनी कंपनीच्या मोबाईल मधून ते उपस्थित असल्याचे फोटो, पुरावा कायदा ६५ ब चे प्रमाण पत्र या कामी बचाव पक्षाने शाबित केले व ज्या मोबाईलने ते फोटो काढले तो मोबाईल युवराज कानचे यांस अटक करताना पोलीसांनी ताब्यात घेतला तो मोबाईल पोलीसांनी युवराज कामटे यांस कधीच परत दिला नाही असा अत्यंत महत्वाचा पुरावा आज बचाव पक्षा तर्फे न्यायालयात सादर केला आहे, सदरचा मोबाईल पोलिसांनी काय केला हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याकामी बचाव पक्षाकडून माहितीच्या अधिकारान्वये दिलेले अर्ज व कारागृहाचे पत्त्यावर संबंधित पोलिसांकडून पाठविलेले कागपत्रावर निशाणी देणेस विशेष सरकारी वकीलांनी घेतलेवी हरकत नोंदवून मे. कोर्टाने त्या कागदपत्रांना निशाणी दिली. सदरकामी उर्वरित पुरावा सादर करण्यासाठी मे. कोर्टाने सदर काम दि ३०/९/२०२४ रोजी नेमले आहे. बचाव पक्षा तर्फे आरोपी युवराज कामटे यांस साक्षीदार म्हणून तपासले व तो पुरावा ऐकण्या साठी वकिलांची पोलीसांची प्रचंड गर्दी जमली होती.