पाटण येथे दरडग्रस्त,पुरग्रस्तांना मदतीचे वाटप, प्रशासनाचा गौरव
पाटण प्रतिनिधी : पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन जीवितहानी झाली, ही नैसर्गिक आपत्ती आहे, ती सुरूच राहणार आहे, डोंगराच्या आजूबाजूला गावे बसले आहेत,त्यांचे सवेक्षॅण करून योग्य ठिकाणी पुर्नवसन करणे गरजेचे असल्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले आहे, सातारा जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या कायमच्या पुर्नवसनासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, दरडग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव सोबत आहोत अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.
शनिवार दिनांक 28 रोजी पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित पूरग्रस्त मदत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, पुणे शहर रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा. रवींद्र सोनावले, पाटण तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, बी.डी.ओ. मिना साळुंखे, पोलिस निरीक्षक एन. आर चौखंडे, नितीन पिसाळ, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, अशोक मदने, माधूरी टोणपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. आठवले पुढे म्हणाले की अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील अनेक गावात भूस्खलन होऊन मोठी जीवितहानी झाली, अनेक संसार उघड्यावर पडले याची माहिती कळताच मोठ्या अडचणींतून आंबेघर व ढोकावळे या ठिकाणी भेट दिली. हि नैसगिॅक आपत्ती होती ती सुरूच राहणार आहे, या लोकांच्या कायमच्या पुनर्वसनासाठी ,त्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार कडे मदतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. आपल्या अडचणीत आम्ही मदतीसाठी सदैव सोबत आहोत, दरड कोसळून होणार्या दुर्घटना टाळण्यासाठी अभ्यास समिती नेमून धोकादायक डोंगराचा सर्वे करून डोंगरा लगतच्या गावांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी ना. रामदास आठवले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड म्हणाले कि ना. रामदास आठवले गोरगरिबांना साठी काम करणारे नेते आहेत, ते स्वतः गरिबीतुन वर आले आहेत, त्यांना गरिबांची जाण आहे, गेल्या महिन्यात सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये दरड कोसळून लोक मृत्युमुखी पडले अनेक कुटुंबे उध्वस्त झाली याची माहिती मिळताच ना. रामदास आठवले मोठ्या अडचणींतून रात्रीचा चिखल तुडवत या ठिकाणी येऊन या लोकांना धीर दिला.आज पुन्हा ते या लोकांना भेटायला आले आहेत, पुन्हा भेटायला आलेले ते एकमेव मंत्री आहेत, या लोकांचे योग्य पुर्नवसन झाले शिवाय आठवले साहेब स्वस्त बसणार नाहीत अशी ग्वाही गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली .
परशुराम वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
आपत्ती काळात पाटण तालुक्यात प्रभावीपणे काम करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलिस निरीक्षक एन.आर.चौखंडे,यांसह समाजसेवक नितिन पिसाळ यांचा सन्मान चिन्ह देऊन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिताताई वाडेकर व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती मुंबई यांच्या वतीने देण्यात आलेल्या तालुक्यातील उपस्थित दरडग्रस्त, पूरग्रस्त नागरिकांना अन्न धान्य, जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे ना. आठवले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी विजय थोरवडे, शहराध्यक्ष दिपक भोळे, युथ अध्यक्ष आनंदराव कांबळे, सुवर्णा माने, सिताराम सपकाळ, यांच्या सह डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती मुंबई कमेटी सदस्य, नागरिक,पूरग्रस्त, उपस्थित होते. रवींद्र सोनावले यांनी स्वागत केले, प्राणलाल माने यांनी आभार मानले.