फलटण : फलटण तालुक्यातील विडणी गावच्या हद्दीमधील अब्दागीरेवाडी येथील जाधव वस्ती मध्ये कत्तल करण्यासाठी तीन महिने ते पाच वर्षांची ५४ जनावरे दाटीवाटीने डांबून ठेवलेली होती. जनावरांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती. सदरची जनावरे कत्तलीसाठी नेण्यासाठी पिकअप सुध्दा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. रूपये आठ लाख पन्नास हजारांची ५४ जनावरे व रूपये पाच लाख किमतीची पिकअप असा एकुण रूपये तेरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने हस्तगत करण्यात आलेला आहे.
या बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, मौजे विडणी गावच्या हद्दीत अब्दागीरेवाडी येथील जाधववस्ती येथे अझीम शब्बीर कुरेशी, इरफान याकुब कुरेशी, जावेद इमरान कुरेशी, तोफिक इम्तियाज कुरेशी, दिशांत इमाम कुरेशी सर्व रा. कुरेशी नगर, फलटण यांनी ५४ जनावरे ही बेकायदा बिगर परवाना कत्तली करण्याच्या हेतुने डांबुन ठेवलेली होती. या बाबतची फिर्याद पोलीस कॉ्स्टेबल महेश जगदाळे यांनी दिली तर पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दराडे करित आहेत.