फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाची (गव्हर्निंग कौन्सिल) पुढील पाच वर्षासाठी फेररचना करण्यात आली आहे. यामध्ये श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे.
सन 2021- 25 या कालावधीसाठी रचना करण्यात आलेल्या नियामक मंडळाचे पदाधिकारी पुढील प्रमाणे – अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष विश्वासराव देशमुख, जगजीवन गरवालिया, अशोक दोशी , सदस्य श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, कु.यशोदाराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, अरविंद शहा, पृथ्वीराज राजेमाने, शिरीष जोशी, रणजीत निंबाळकर, रमणलाल दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, हेमंत रानडे, नितीन गांधी, संजय भोसले, भोजराज नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, डॉ. पंढरीनाथ कदम, शरद रणवरे, बाबासाहेब गंगावणे, चंद्रकांत पाटील, सौ. नूतन अजितराव शिंदे, सौ.वसुंधराराजे नाईक-निंबाळकर, चंद्रकांत रणवरे रामचंद्र फरतडे यांचा समावेश आहे.