भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सागरदादा पवार ठरले कॅन्सर ग्रस्त महीले साठी देवदुत मनसे कोरेगाव तालुका अध्यक्ष सागर बर्गे यांनी सागरदादा पवार यांना फोन केला व सर्व कॅन्सर ग्रस्त महिलेची परिस्थिती सांगितली कि कोरेगावच्या सुरेखा शैलेश बर्गे यांना 6 महिन्या पुर्वी कॅन्सर झाला आहे व त्यांनचे पति हयात नाहीत त्यांना दोन मुली आहेत यांचा सर्व खर्च त्यांनाच करावा लागतो त्यामुळे त्यांच्या कडे कॅन्सर या आजारावर उपचार घेण्यासाठी पैसे नाहीत.हे सगळे ऐकल्या नंतर सागर पवार यांनी तत्काळ कोरेगाव ला जाऊन त्यांना आर्थिक मदत केली व पुढिल उपचाराचा खर्च उचलला.या निर्णयाचे सागर दादा पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी आर्थिक मदत केली आणि त्यांनी स्वतः सांगितले की माणसातला देव माणूस हा माननीय सागर दादा पवार यांच्या रूपाने आज पाहायला मिळाला या काळात कोणी कोणाला मदत करत नाही पण सागर दादा यांना फोन केला आणि त्यांच्या रूपाने साक्षात देवदूत समोर उभा राहिला जेव्हा सर्व संपलं असं वाटत होतं तेव्हा दादा यांनी मला मदत केली त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि सागर दादा यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






















