नागठाणे /प्रतिनिधी
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या मार्फत दिला जाणार राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव शिक्षणरत्न पुरस्कार नाशिक महानगरपालिका शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.उज्वला सुधाकर पवार यांना
मुंबई येथील राज्यस्तरीय गुणिजन गौरव सोहळ्यात प्रदान करण्यात आला
आपल्या शैक्षणिक 19 वर्षाच्या शैक्षणिक सेवेत काम करताना
नाशिक महानगरपालिका शाळा नं.80 कामठवाडे येथील शिक्षिका सौ.उज्वला पवार यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणारे शैक्षणिक व इतर सांस्कृतिक असे स्तुत्य उपक्रम राबविले त्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची दखल घेउन त्यांची या पुरस्काराची निवड करण्यात आली होती
त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मुख्याध्यापिका मेघा भांबरे तसेच शाळेतील शिक्षिका शोभा वाघ, राजेश अमृतकर,योगीता हिरे, उर्मिला पवार,अर्चना पाटील, संजय पाटील, सुषमा भामरे यांनी अभिनंदन केले असून यापुढील शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी विद्यार्थी उपयोगी उपक्रम राबवून शाळेचे नाव आपल्या नावाप्रमाणेच “उज्वल”करावे अशा शुभेच्छा दिल्या आहे




















