कराड : प्रा.डॉ. चंद्रकांत माने यांना एक्सलंट टीचर अवॉर्ड मिळाल्याने पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आर. के. भोसले सुधीर सायकल मार्ट स्वतंत्र गणेशोत्सव मंगळवार पेठ, कराड ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. माने यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत केलेल्या भरीव कामाबद्दल पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी “शिक्षकांनी उल्लेखनीय कार्य करण्यासाठी इतर शिक्षकांना प्रेरणा देऊन त्यांना प्रोत्साहित करावे” असे मत पालकमंत्र्यांनी सत्कार समारंभानिमित्त व्यक्त केले.
डॉ माने हे गेली 36 वर्षे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथे भूगोलशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सद्या ते भूगोलशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विविध समितीवर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सन 2015-16 मध्ये त्यांना भूगोल भूषण पुरस्कार ही प्राप्त झाला आहे.
या वेळी माजी नगरसेवक मा.बाबासाहेब भोसले, कराड लोकशाही विकास आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, नगरसेवक मा. सौरभ (तात्या) पाटील , लोकशाही विकास आघाडीचे माजी अध्यक्ष सुभाषराव पाटील, माजी नगरसेवक जगन्नाथ माने, माजी नगरसेवक विलासराव कुंभार, जयंत बेडेकर ,राजेंद्र डुबल व मंगळवार पेठ ,कऱ्हाड येथील नागरिक उपस्थित होते.





















