महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(वाई)
वाई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दिवसे दिवस वाढत्या गर्दीमुळे आणि कोरोनोची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी शनिवार १२/०९/२०२० आणी १३/०९/२०२० रविवार रोजी वाई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संचालक अधिकारी आणी कर्मचार्यांनी घेतला असल्याची माहिती सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली
ते पुढे बोलताना म्हणाले गेल्या दोन महिन्या पासून कोरोनो या अति भयंकर रोगाने वाई शहरा सह तालुक्यातील प्रत्येक गावात धुमाकुळ घालण्यास सुरवात केली आज अखेर वाई तालुक्यात २ हजार कोरोनो पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर ३८ रुग्णांना ऊपचारा दरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहेत अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी वाईचे महसूल पोलिस पंचायत समिती ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी प्राथमीक आरोग्य केंद्रे हे सर्व प्रशासनातील अधिकारी एकत्रीत येऊन रोगाचा फैलाव रोखण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत
वाई बाजार समिती मध्ये दररोज पहाटे आणि सायंकाळी शेतकरी आपला तरकारी भाजीपाला विक्री साठी आणतात हा माल खरेदी साठी रायगड जिल्ह्यातील महाड रोहा अलिबाग पोलादपुर खेड इंदापुर चिपळूण या भागातील मोठ मोठे व्यापारी शेकडोच्या संख्येने येतात त्या मुळे बाजार समिती मध्ये नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे त्यातून कोरोनो रोगाला आमंत्रण मिळु नये याची खबरदारी घेण्यासाठी वाई कृषी उत्पन्न बाजार समिती स्वयम स्फृर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे





















