बारामती : देशात व राज्यात रक्तचा तुटवडा भासत असल्याने डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून तसेच मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ, सर्व पत्रकार बांधव ,सर्व ग्रामपंचायत, सर्व सामाजिक सेवाभावी संस्था, सर्व पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने भव्य रक्तदान शिबिर वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांच्यावतीने अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले आहे.
बुधवार दि. २२ रोजी भव्य रक्तदान शिबिर याचे आयोजन नाचे ठिकाण वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंकित पणदरे दूरक्षेत्र, करंजेपुल दूरक्षेत्र, सुपा दूरक्षेत्र आणि श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय पळशी रोड मोरगाव या ठिकाणी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या वतीने वाहन सुरक्षेच्यादृष्टीने हेल्मेट व रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच सर्व नागरिकांनी या भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे आव्हान या कार्यक्रमाचे संयोजक सोमनाथ लांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी केलेले आहे.
नाव नोंदणी साठी संपर्क ज्ञानेश्वर सानप 9623333500 ,अमोल भुजबळ 9960770217 व पोलीस स्टेशन 02112 272133.