खटाव : गणेशवाडी ता.खटाव येथील सुमित महामुनी या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळ वळण लागले आहे. आत्महत्या प्रकरणात नाव घेतल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी युवकाच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित महामुनी या युवकाने मंगळवार (२१) रोजी शेतातील शेडच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. शनिवारी दोन युवकांनी महामुनी यांच्या घरात प्रवेश करत सुमितच्या कुटुंबियांना ‘माझे नाव पोलिसांना सांगाल, तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.