कराड : भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ओबीसी मोर्चा जागर अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यामातून जनतेमध्ये ओबीसी आरक्षणाविषयी माहिती देऊन जनजागृती केली जात आहे. या जागर अभियानाचे कराड शहरात स्वागत करण्यात आले.
दत्त चौक कराड येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मा. विक्रमजी पावसकर, रामकृष्ण वेताळ, अंकुश लोहार, सुदर्शन पाटसकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, सुनिल नाकोड, शेखर लोखंडे, आण्णासो काशीद, मा. एकनाथ बागडी, मा.पै. धनंजय पाटील, मा. महेशकुमार जाधव, सातारा जिल्हा ओबीसी सरचिटणीस भरत जंत्रे तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व अध्यक्ष-उपाध्यक्ष, ओबीसी महिला उपस्थितीत होत्या.