‘बी.पी. फायनान्शिअल आणि मॅनेजमेंट कन्सल्टन्सी ( O.P.C.) प्रायव्हेट लिमिटेड,या फर्मचा कराड (आगाशिवनगर) येथे भव्य शुभारंभ’
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
“ज्यांच्या पायावर डोकं टेकाव अशी माणसं आज आपल्याला दिसत नाहीत” अशी परिस्थिती असताना कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय काही माणसं अभूतपूर्व यश संपादन करून आपापल्या क्षेत्रात आदर्श निर्माण करतात. प्रामाणिकपणा, ध्येयनिष्ठा व आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत यशस्वी होणे हे जेवढे वाटते तेवढे सहज नाही.
बी.पी.फायनान्शिअल म्हणजे बिजनेस पीपल आणि मॅनेजमेंट कन्सल्टन्सी अर्थात (O.P.C.) प्रायव्हेट लिमिटेड या फर्मचा कराड येथील आगाशिवनगर या ठिकाणी भव्य अशा स्वरूपात शुभारंभ झाला. नव व्यवसायाला आर्थिक पाठबळ व
नवउद्योजकांना सक्षम कसे करायचे तसेच व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी कशा प्रकारे सोडवायच्या याविषयी बी.पी. फायनान्शिअल अँड मॅनेजमेंट कन्सल्टन्सी काम करतेय.
शासकीय योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येईल,यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,पी. एम.ई. जी.पी, महाराष्ट्र शासनाचे उपक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,
स्टार्ट अप तसेच स्वयं रोजगारातून समृद्धीकडे या सर्व योजनांचे उद्योजकांना अर्थसाह्य मिळवून देणारी एक अग्रणी अशी संस्था म्हणून बी.पी. फायनान्शिअल या संस्थेचा अख्ख्या महाराष्ट्रात उल्लेख होतो. संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे बिनव्याजी सबसिडी योजनेसाठी लागणारे कागदपत्र, बँकेची मंजुरी, व्याजाचा परतावा हे सर्व आता एकाच छताखाली असल्याने व्यावसायिकांना किंवा
नवउद्योजकांना व्यवसाय निवडणे तो पूर्णत्वास नेणे व व्यवसायात यशस्वी होणे हे खूप सुलभ झाले आहे.
यावेळी या कंपनीचे संस्थापक स्वप्निल पाटील यांच्या हस्ते फीत कापून खऱ्या अर्थाने उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, “श्रीमंत होण्यासाठी व्यवसाय करावा हे सगळेच ओरडून सांगत असतात पण व्यवसाय उभा करण्यासाठी पैसा कुठून व कसा उभा करावा हे कोणीही सांगत नाही”. शासकीय योजनांच्या सर्व प्रकारची माहिती इथे दिली जाणार आहे. याशिवाय योजनांची मंजुरी, बँकेची मंजुरी, कागदपत्रांची पूर्तता कशी करावी व पाच वर्षे व्याज परताव्याचे काम या बी.पी. फायनान्शिअलच्या मार्गदर्शनातून व्यवसायिकांना होणार आहे.नवउद्योजकांना व्यवसाय करायचा असेल तर एक वेळ अवश्य या कराड (आगाशिवनगर) शाखेला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी कृष्णा जगताप या अहमदनगर येथून आलेल्या लाभार्थ्याने बी.पी. फायनान्शियल या शाखेविषयी आपला अभिप्राय नोंदवला. यामध्ये त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यामध्ये कर्ज मंजुरीसाठी कराड शाखेचे व्यवस्थापक संदेश देशमुख व कंपनीचे संस्थापक स्वप्निल पाटील यांचे बहुमूल्य सहकार्य लाभल्याचे सांगितले.
व्यवसाय तुम्ही निवडा त्यासाठी लागणारा पैसा आम्ही उभा करू.” हे ब्रीदवाक्य असणाऱ्या बी.पी. फायनान्शिअल आणि मॅनेजमेंट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड चे काम महाराष्ट्रासह इतर राज्यातही चालू आहे. बाजार,बेकरी, ऊस तोडणी मशीन, फर्निचर दुकान, भांडी दुकान, उत्पादने निर्मिती मशीन, हॉस्पिटल मशिनरी, मेडिकल, शेळीपालन, कापड दुकान,होम लोन, फॅब्रिकेशन दुकान, गिफ्ट शॉपी,हॉटेल, ट्रक, पोल्ट्री फार्म, गाई-गोठा प्रकल्प, टी-परमिट कार, जेसीबी याशिवाय सर्व मालवाहतूक व
व्यवसायासाठी,शेती उद्योगासाठी
अतितातडीचे, सबसिडीचे,बिनव्याजी कर्ज ही येथे उपलब्ध होणार आहे.
येथील शाखेचे व्यवस्थापक संदेश देशमुख यांनी बी.पी. फायनान्शियल ही नवउद्योजकांना नवसंजीवनी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या दिमाखदार अशा शुभारंभ प्रसंगी कराड तालुक्यासह पाटण व आसपासच्या शहरी-ग्रामीण भागातून अनेक नवउद्योजक उपस्थित होते.
































