पाटण : पाटण येथील दि पाठण अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. 29 रोजी दुपारी 1 वाजता श्रीराम मंदीर पाटण येथे बॅंकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली असल्याची माहिती व्यवस्थापक के.आर.शिंदे यांनी दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, 2020-21 चा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मंजुरी देणे, निव्वळ नफा वाटणीस मंजुरी देणे, अंदाजपत्रकास मंजुरी देणे, अंदाजपत्रकापेक्षा ज्यादा झालेल्या खर्चास मान्यता देणे, लेखा परीक्षण तपासणी, अहवालाचे वाचन, वैधानिक अहवालातील दोष दुरूस्ती, लेखापरीक्षकाची नियुक्ती, त्यांचे मानधन ठरवण्याचा अधिकार संचालक मंडळास देणे, पोटनियम दुरूस्तीस मान्यता देणे, सभासदांची रजा क्षमापित करणे व अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिलेले निर्देश व नियमांचे पालन करून या सभेचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ज्या सभासदांना प्रत्यक्षदर्शी सभेला उपस्थित राहता येणार नाही. त्यांनी, ऑनलाईन पध्दतीने पंधरा मिनिटे अगोदर सभेला हजर राहता येणार आहे. सभेस सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही के.आर.शिंदे यांनी केले आहे