1 कोटी 82 लाख 424 रुपये वसुली
फलटण : शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये फलटण येथे दिवाणी आणि फौजदारी मिळून 220 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती फलटण तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश अर्चना ठाकूर यांनी दिली आहे.
बँका, पतसंस्था, ग्रामपंचायत, महावितरण आणि फायनान्स कंपनी आदी या सर्वांचे मिळून 1 कोटी 82 लाख 424 रुपये वसुली यावेळी करण्यात झाली आहे.
लोक अदालतीमध्ये सह. न्यायाधीश उज्वला वैद्य, शुभांगी ढवळे, शितल साबळे, केदार पवार, युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा पॅनल तयार करण्यात आले होते. यामध्ये फलटण बार असोसिएशनचे सदस्य विधिज्ञ तेजस्वी ढेकळे, अविंदा चोरमले, स्नेहल मुळीक, पौर्णिमा पवार, प्रत्यंचा पवार, उल्का कर्चे ,रेश्मा गायकवाड, सुनील शिंदे, राहुल मदने, निलेश भोसले, अमित घनवट, अनिल कुंभार यांनी काम पाहिले, या लोकअदालती मध्ये फलटण न्यायालयातील तडजोड पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व बँक प्रकरणे, महिलाविषयक पोटगी प्रकरणे, कौटुंबिक छळ व हिंसाचार तसेच धनादेश न वटल्याच्या प्रकरणी दरखास्त ठेवण्यात आल्या होत्या. या लोकअदालती मध्ये पक्षकार तसेच विधिज्ञ यांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवला. पंचायत समिती फलटणच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, तालुका विधी सदस्य सचिव विजय गुळवे, फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष एम.के.शेडगे, वकील बार असोसिएशन कमिटी सदस्य, विधिज्ञ ,फलटण शहर ग्रामीण तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि फलटण न्यायालयातील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
































