कर्जत : जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. अनावश्यक खर्च टाळून समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात, याचीच दखल घेत द रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट, नीरा यांच्या वतीने शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
बारामती अग्रो चे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते २००० कॅमेलिन सुपर रायटिंग किट चे वाटप शालेय मुलांना करण्यात आले.
यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, मा.जि. प.सदस्य विराज काकडे, मा.बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, तनुजा शहा, पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, व द रॉयल चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुरज कोरडे यांनी केले तर, सूत्रसंचालन विजय गेजगे यांनी केले व आभार रियाज पठाण यांनी मानले.