लोणंद : पाडळी, ता.खंडाळा येथील युवा पत्रकार आबासो धायगुडे-पाटील यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावांमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास एकूण १०१ रक्तदात्यांनी विक्रमी स्वरूपाच रक्तदान केलं आहे. या रक्तदान शिबिरास अपेक्षा जास्त आणि चांगला प्रतिसाद लाभल्याने ग्रामस्थांनी विशेष समाधान व्यक्त करताना आदर्श मित्र मंडळाचे खूप कौतुक केलेले आहे.
हे रक्तदान शिबीर संपन्न होत असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी दर्शविली. खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती श्रीमती वंदनाताई अविनाश धायगुडे पाटील, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, अविनाश नलावडे, युवा नेते ऋषिकेश धायगुडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल पवार, सरपंच स्वाती ठोंबरे, भादवडेचे माजी सरपंच मनोज पवार, बोरीचे सरपंच बापूराव धायगुडे-पाटील, तलाठी चंद्रकांत जाधव, ग्रामसेवक मल्हारी शेळके, जेष्ठ नेते तात्यासाहेब धायगुडे पाटील, राजू नाना धायगुडे नांगरे पाटील, उपसरपंच दिपक धायगुडे पाटील, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ,भानुदास गावडे, लक्ष्मण बरकडे, किशोर दीक्षित, शिवाजी वाघमारे, गुलाब पठाण, रामचंद्र धायगुडे, हनुमंत धायगुडे , दतात्रय धायगुडे, विठ्ठल धायगुडे , सदस्य रणदिश धायगुडे, हरिभाऊ माने, ह.भ.प. संतोष महाराज, सचिन ननावरे, बाळा तांबे, अविनाश धायगुडे, अक्षय धायगुडे, विकास धायगुडे, सचिन धायगुडे, दादा धायगुडे यांच्या सह इतर ग्रामस्थ तसेच आदर्श मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बालाजी ब्लड बँकेचे डॉ.उमेश सन्मुख, स्मिता पाटील, अक्षता डोंबे, प्रशांत पोळ, चेतन जाधव, सलिम बागवान, सविता सातपुते, तेजस भोसले आदीनी ही रक्तदान शिबिराची प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. या शिबिरा दरम्यान, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, पोलिस कर्मचारी प्राथमिक शाळा, वायरमन, अन्नधान्य पुरवठा, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार, बालाजी ब्लड बँक आदीसह कोरोना काळात योगदान देणाऱ्या योद्ध्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.