कला व वाणिज्य महाविद्यालय कोयनानगर च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास मा. प्रा. अभय जायभाये यांनी सदिच्छा भेट दिली.दि.१३.३.२०२२ रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय, कोयनानगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे रासाटी या ठिकाणी सुरू आहे.या शिबिराला शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मा.प्रा.अभय जायभाये तसेच विभागीय समन्वयक व बाळासाहेब देसाई कॉलेज चे एन.एस.एस. प्रमुख प्रा.डॉ. जी. एस. पट्टेबहादूर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एस.झुळझुळे व कार्यक्रम अधिकारी प्रा.रोहन क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमार्फत करण्यात आलेल्या श्रमदानाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे उद्बोधन केले. यावेळी ते म्हणाले की, आपण एक राष्ट्रीय काम करत आहोत. विशेष श्रम संस्कार शिबिरातून आपण श्रमाचे महत्व पटवून दिले पाहिजे. यावेळी डॉ. जी.एस पट्टेबहाद्दुर यांनी एन.एस.एस. चे ब्रीद वाक्य, व एन.एस.एस. ची स्थापना व ध्येय धोरणे याविषयी माहिती सांगीतली.रासाटी गावातील विशेष श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.जी.एस.झुळझुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा.रोहन क्षीरसागर, प्रा.अमोल माने, प्रा.सौ.सुषमा कुंभार व एन.एस.एस. विभागातील सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. या सदिच्छा भेटीवेळी रासाटी गावच्या सरपंच सौ.सुरेखा कदम, उपसरपंच सौ.अश्विनी सपकाळ, तसेच आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.