सातारा- शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले इंन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक तंत्रनिकेतनमध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूचा फायदा २५ विध्यार्थ्यांना झाला. कुपर कॉर्पोरेशन सातारा या नामांकीत कंपनीत तंत्रनिकेतनमधील २५ विध्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली असून विध्यार्थ्यांना स्वतःचा पायावर उभे करण्यासाठी तंत्रनिकेतन कायम कटीबद्ध राहील असे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
दि. २७/०४/२०२२ रोजी तंत्रनिकेतनमधील तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजि. पदविका या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुपर कॉर्पोरेशन सातारा या कंपनीतील एच.आर विभागातील अधिकारी यांनी तंत्रनिकेतमध्ये उपस्थित राहुन विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे तंत्रनिकेतनमधील २५ विद्यार्थ्यांची नियुक्ती कंपनीत करण्यात आली.संस्थेच्या अध्यक्षा, सौ. वेदांतिकराजे यांनी स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने सन २००८ मध्ये पदविका तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे दालन सुरु करुन ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट सातारा संचलित, अभयसिहराजे भोसले तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांची जगाच्या पाठीवर कुशल अभियंता अशी वेगळी ओळख निर्माण व्हावी हा हेतु साध्य करण्याचा प्रयत्न या तंत्रनिकेतनमध्ये केला जातो.
तसेच येथे येणारा विद्यार्थी १०० टक्के यशाची खात्री बाळगू शकतो.तंत्रशिक्षण घेतल्यानंतर सदर विद्यार्थ्याला रोजगारांची संधी निर्माण करुन देण्यामध्ये तंत्रनिकेतन सातारा जिल्हयामध्ये अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून कुपर कॉर्पोरेशन कंपनीतील अधिकाऱ्यांनी २५ विद्यार्थ्यांची नियुक्ती केली. नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांचे सौ. वेदांतिकराजे भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस. यु.धुमाळ, उपप्राचार्य आर. डी. नलवडे, कार्यालयील अधिक्षक भोसले, मेकॅनिकल विभागप्रमुख एस.जे. जगताप, कुपर कॉर्पोरेशन लि. कंपनीचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.