सातारा प्रतिनिधी। म्हसवड पोलिस स्टेशन हद्दीतील धामणी ता माण येथील होलार मळा या शिवारात दहा गुंठेक्षेत्रात मका या पिकात लावलेली २८५ गांजाची झाडे असल्याची माहिती गोपनिय खबर्याकडुन मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी निलेश देशमुख व म्हसवड पोलिस स्टेशन चे सपोनि बाजीराव ढेकळे यांच्या पथकानी आज गुरुवारी धाड टाकून अंदाजे ९० किलो गांजा जप्त केला रात्री उशीरा पर्यात हि कारवाई सुरु होती या बाबत म्हसवड पोलिस स्टेशन चे सपोनि बाजीराव ढेकळे यानी दिलेरी माहिती अशी गुरुवार दिनांक १२/७/२०२१ रोजी गोपनीय खबर्याकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे धामणी येथे बबन भिवा खाड़े यांच्या होलार मळा या शिवारात गांजा असल्याची माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, सपोनि बाजीराव ढेकळे यांच्या पथकाने आज गुरुवारी सांयकाळी सहाच्या सुमारास धामणी येथे धाड टाकून दहा गुंडे क्षेत्रावर लावलेल्या मका या पिकात बेकायदेशीर पणे स्वताच्या फायद्यासाठी गांजांची २८५ झाड़े लावली होती ती सर्वा झाड़े पोलिस कारवाई करुन ताब्यात घेतली दोन सरकारी पंचांच्या सहायाने पंचनामा केला असता या २८५ गांजांच्या झाडांचे वजन ९० किलो झाले असुन या दमदार कारवाई मध्ये उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख,म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि बाजीराव ढेकळे, नायब तहसीलदार व्ही एन करें, पोलिस नाईक तांबे, नितिन धुमाळ, पोलिस नाईक रवि काकडे, पोलिस काळे, पोलिस कुदळे, पोलिस फडतरे, संतोष बागल, किरण चव्हाण पोलिस सानप यांनी सहभाग घेतला होता पोलिसांनी आपल्या शेतातील गांजाच्या झाडावर कारवाई करुन शेतात धाड टाकल्याची माहिती खाड़े मानना समजताच बबन खाड़े हे फरारी झाले होते रात्री नवू वाजे पर्यात कारवाई सुरु होती