फलटण : किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्याने मारहाण केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी शंकर खोमणे 48 रा, मुरूम, ता. फलटण, व्यवसाय किराणा दुकान, यांनी फिर्याद दिली असून रोहित शांताराम बोंद्रे, निखिल मोहन बोंद्रे, गणेश सेवन बोंद्रे, अजय एकनाथ बोंद्रे, शांताराम हनुमंत बोंद्रे सर्वजण रा.मुरूम, ता. फलटण यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.19 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजी शंकर खोमणे (वय 48 वर्षे) व्यवसाय – किराणा दुकान रा. मुरूम, ता. फलटण यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर मोटरसायकलवर असलेल्या बबल्या धुमाळ यास कानाखाली मारल्याचे कारणावरून खोमणे यांनी विचारणा केली असता. त्याचा राग मनात धरून घरातील नितीन मोहन बोंद्रे, गणेश जयवंत बोंद्रे, अजय एकनाथ बोंद्रे, शांताराम हनुमंत बोंद्रे यांनी लाकडी काठीने मारहाण करून खोमणे यांना जखमी केले.
सर्वांनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमून खोमणेचे किराणा दुकान वर दगडफेक करून तसेच खोमणे ची पत्नी नंदा चंद्रकांत खोमणे यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार हांगे पुढील तपास करीत आहेत