महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / माण :
भ्रष्टाचार प्रकरणी अनेक लेखी तक्रारी जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे दाखल असून या तक्रारींचे सबळ पूरावे तक्रारदार देण्यास तयार असलेचे लेखी कळवून देखील महिनो महिने जिल्हाधिकारी या प्रकरणी तक्रारदारास का बोलावीत नाहीत यातून जिल्हाधिकार्यांची अनास्था दिसून आली आहे. यावरुनच त्यांची विश्वासर्हता भोसले व जनतेच्या प्रति संपत चालली असल्याचे मत प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त करतानाच नावात सिंह,वाघ असून चालत नाही तर त्यासाठी स्वत:च्या कर्तव्यावरती ठाम असावे लागते अशी बोचरी टिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
चारा छावणी घोटाळा, याकामी बिले अदा करताना अधिकार्यांनी घेतलेली टक्केवारी व अवैध वाळूत महसूल अधिकार्यांचे गुंतलेले हात या सर्व भ्रष्टाचाराशी संबंधीत तक्रारींची सखोल चौकशी करणेच्या मागणीची जिल्हाधिकारी सातारा यांनी जवळ जवळ गेली सहा महिने कोणती चौकशी केली याची कल्पना करवतच नाही. यावरून एवढ्याचसाठी की तक्रारदास बोलावून पुरावेच घेण्यास जिल्हाधिकारी तयारच नाहीत हेच स्पष्ट झाले असून यातूनच त्यांच्या कार्यप्रणालीचा उजेड स्पष्टपणे दिसत आहे. असे असतानाच याउपरोक्त आमची एकच आणी शेवटची,निर्वाणीची विनंती आहे, ती असी की चौकशी झाली किंवा नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत परंतु लोकशाहीचा मान राखत जनतेच्या तक्रारीची दखल घेत काहीतरी निर्णय स्पष्ट करावा जेणेकरुन भोसले यांना पुढील कायदेशीर व न्यायिक लढाईसाठीचा मार्ग मोकळा होईल.
भ्रष्टाचार्यांना संविधानीक मार्गाने शिक्षा होऊन जनतेला न्याय मिळण्यास मदत होईल हीच या प्रसिध्दीपत्रकाद्वारे अखेरची व निर्वाणीची विनंती असलेचे संजय भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.