महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण जिल्हा सातारा यांचे संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लावण्यात आल्याची माहिती प्रशिक्षणार्थी प्रतिक द्वारकानाथ नवले यांनी दिली.
सातव्या सत्रातील विध्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शेती संवर्धन याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कृषिदूत प्रतिक द्वारकानाथ नवले व महात्मा फुले युवा मित्र मंडळ, विठ्ठलवाडी यांनी एकत्रीतपणे विठ्ठलवाडी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पूर्ण केला.
यावेळी विठ्ठलवाडी गावातील युवक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी. निंबाळकर ,प्रा.ए. डी. पाटील व इतर सर्व प्राध्यापकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.