कराड : जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून कराड नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
शनिवार पेठेत लल्लूभाई चाळ कॉक्रेटिकरण करणे या कामाचे शुभारंभ राजेंद्रसिंह यादव गटनेते कराड नागर परिषद कराड यांच्या हस्ते मंगळवार दि.१४ रोजी झाला. यावेळी विजयसिह यादव (भाऊ) नगरसेवक हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, जयंत बेडेकर, सुहास पवार, अखतर आंबेकरी, शिवाजीराव पवार, वैभव हिंगमिरे, संजयसिह यादव, बापू देसाई, दिनेश यादव, नगरसेविका सौ. स्मिता हुलवान, आशा मुळे, सौ. सुप्रिया खराडे यांच्यासह राहुल चव्हाण, प्रदीप माने, अनिल जाधव, माधव पिसे, शिवाजी माळी (अण्णा), जमनादास ठक्कर, केतन ठक्कर, बच्चू रावल, राजू रावल, किशोर रावल, संजय माळी, सतीश माळी, दीपक शहा, अरुण बेडके,श्री रावळ, शरद मुंढेकर, राजू कोरडे, शिरीष शहा, शरीष घोडके, संदीप मुंढेकर, विलास बेडके, दीपक कोरडे, सौरभ शहा तसेच स्थानिक महिलांचा व नागरिकांची उपस्थिती होती.




















